ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना साडे नऊ वर्षांची शिक्षा
 महा त भा  13-Jul-2017


ब्राझीलचे माजी राष्ट्रपती लुईस इनासीओ लूला दा सिल्वा यांना भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ब्राझील न्यायालयाने साडे नऊ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाच्या या शिक्षेविरोधात ते अपील करू शकतात असे, देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. १९८० नंतर ब्राझीलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नेत्याला अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


लूला दा सिल्वा हे २००३ ते २०११ या कालखंड ते ब्राझीलचे राष्ट्रपती होते. ब्राझीलमधील डाव्या पक्षाचे ते नेते आहेत. ब्राझील न्यायालयाचे न्यायाधीश सर्जियो मोरो यांनी काल ही शिक्षा सुनावली आहे. ब्राझीलच्या एक बांधकाम कंपनीकडून सिल्वा यांनी कंपनीला परवानगी देण्यासाठी लाच म्हणून १ मिलियन डॉलर आणि एक घर घेतल्याचे तपासात म्हटले गेले आहे. तसेच सिल्वा आणि त्यांच्या समर्थकांनी ही फक्त एक राजकीय खेळी असून फक्त राजकीय द्वेषापोटी विरोधकांकडून हा आरोप केला गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.