एस बी आय च्या NEFT आणि RTGS दरात कपात
 महा त भा  13-Jul-2017


 

भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुश खबर आहे, भारतीय स्टेट बँकेने आपल्या NEFT आणि RTGS दरात ७५% एवढी कपात केली आहे. त्यामुळे आता मोबाईल बँकिंग तसेच इन्टरनेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक प्रमाणात कॅशलेस व्यवहार करणे परवडणार आहे.

NEFT आणि RTGS या ऑनलाईन व्यवहारामुळे कोणत्याही बँक खात्याशी पैश्याची देवाणघेवाण करणे सोयीचे पडते. यात स्टेट बँकेच्या व्यवहारात १० हजार रुपयांचा व्यवहार केल्यास २ रुपये NEFT दर लागत असे, आता हा दर घटून १ रुपये एवढा झाला आहे. त्याचबरोबर १० हजार ते १ लाख रुपयांच्या व्यवहारात ४ रुपये NEFT दर घटून आता २ रुपये एवढा केला गेला आहे. तसेच २ लाख ते ४ लाख रुपयांच्या व्यवहारात २० रुपये ऐवजी आता ५ रुपये दर लागणार आहे.

त्यामुळे आता ग्राहकांच्या ऑनलाईन व्यवहार खिशाला परवडणारे असतील. यात जीएसटी करात कुठलाही बदल केला गेलेला नाही.

Embeded Object