विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल फीवर जीएसटी लागू नाही
 महा त भा  13-Jul-2017


 

नवी दिल्ली: शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील वास्तव्य शुल्कावर वस्तु सेवा कराची आकारणी केली जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षणाशी संबंधित काही बाबींवरील कराच्या दरात कपात झाल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

Embeded Object

शैक्षणिक संस्थांमार्फत विद्यार्थी, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा वस्तू आणि सेवा करमुक्त असतील. शाळा पूर्व शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण तसेच शिक्षणाचा एक भाग म्हणून, प्राप्त करावयाची अर्हता आणि मान्यता प्राप्त व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत घेतले जाणारे शिक्षणही वस्तू आणि सेवा करमुक्त असेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Embeded Object

त्याच बरोबर नागरी भागातील सोसायटी वेलफेयर संघटनांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा या अत्यल्प जीएसटीच्या कक्षेत येतील. त्यांच्यावर अधिक कर लादला जाणार नसल्याचे देखील मंत्रालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Embeded Object