गंगा नदीच्या पात्रात कचरा टाकल्यास आता होऊ शकतो दंड
 महा त भा  13-Jul-2017

 

गंगा नदीच्या ५०० मीटरमधील पात्रात नागरिकांनी कचरा टाकल्यास अथवा कचरा केल्यास तब्बल ५० हजार रुपयांचा दंड लावला जाईल असे आदेश आज नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल यांनी जाहीर केले आहेत. तसेच गंगा नदीच्या १०० मीटरच्या परिसरात आता कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य केले जाणार नाही असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

 

उत्तराखंडमधील हरिद्वार ते उत्तरप्रदेशमधील उन्नाव या गावांपर्यंतच्या नदी किनाऱ्यावर कचरा टाकल्यास त्याच वेळी ५० हजार रुपयांचा दंड होईल असे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी देखील गंगा नदीला जीवंत नदीचा दर्जा देण्यात आला होता. गंगा नदीच्या संरक्षणाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगण्यात आले आहे.

 

गंगा नदीच्या १०० मीटरच्या परिसराला ‘नो डेवलपमेंट झोन’ असे घोषित करण्यात आले आहे. गंगा नदी ही भारतातील सगळ्यात जुनी आणि पवित्र नदी मानली जाते त्यामुळे तिचे संरक्षण करणे हे देशातील नागरिकांचे कर्तव्य असल्याने वरील आदेश देण्यात आले आहे.