बापरे! भूमी अक्षयला का मारतेय?
 महा त भा  12-Jul-2017

 

खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेंडनेकर यांचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ याचे एक नवे गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. मात्र या गाण्यात भूमी अक्षयला चांगलेच काठीने मारतांना दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच शेअर केले जात आहे. अक्षयने त्याच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून हे नवीन गाणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले आहे.

Embeded Object

या गाण्यात उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे मोठ्या उत्सहात खेळली जाणारी लठ्ठ मार होळी याचे चित्रण केले असून या गाण्यात भूमी अक्षयसोबत लठ्ठ मार होळी खेळतांना दिसत आहे. या गाण्याचे बोल ‘लठ्ठ मार’ असेच लिहिण्यात आले आहे. गाण्यात भूमी अक्षयवर नाराज असलेली दाखवली असल्याने अक्षय कुमार क्षमा मागण्यासाठी भूमीकडे जातो याप्रसंगी हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

 

नारायण सिंघ या चित्रपटाचे दिग्दर्शक असून घरात शौचालय नसेल तर घरातील महिलेला कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते, याची कथा या चित्रपटात मांडली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळणार आहे.