'जागतिक शांततेसाठी भारत-चीन यांच्यातील संबंध महत्त्वाचे' - एस.जयशंकर
 महा त भा  11-Jul-2017


सिंगापूर : भारत आणि चीन या दोन जागतिक महाशक्ती आहेत. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध हे जागतिक शांतातेतील अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे मत परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी आज व्यक्त केले. सिंगापूर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ५० व्या आसियान (असोसिएशन ऑफ साउथइस्ट एशियन नेशन्स) देशाच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.


गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यामध्ये सुरु असलेल्या तणावाकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. आसियान देशांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-चीन यांच्यातील संबंध चांगले राहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण दोन्ही देशांमधील संबंधांचा परिणाम हा सर्वांवर पडणार आहे. त्यामुळे या जागतिक स्थिरता आणि शांतते यासाठी दोन्हांचे संबंध अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.


याच बरोबर दोन्ही देशातील संबंध देखील बहुमुखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. चीन आणि भारत यांच्यातील व्यापार देखील मोठ्या प्रमाणत वाढला आहे. भारतामध्ये विकास कामे वाढली आहेत. तसेच भारताच्या विकासाच्या फायदा त्याच्या शेजारील राष्ट्रांना देखील व्हावा, ही भारताची भूमिका नेहमी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.

Embeded Object


गेल्या महिन्याभरापासून सिक्कीम येथील सीमेजवळ भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून वारंवारपणे भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर आता भारतीय सैन्येने देखील चीनला टक्कर देण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.