सागरी पर्यटन सुधारणांसाठी जल वाहतूक मंत्रालयाचा पुढाकार
 महा त भा  10-Jul-2017


 

देशातील सागरी पर्यटन उद्योगातील नियामक प्रक्रियेच्या अनुषंगाने पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने जल वाहतूक मंत्रालयाने काही सुधारणांची घोषणा केली आहे. त्यानुसार सागरी पर्यटन करु इच्छिणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी देण्याबाबतची यंत्रणा एकल खिडकी मार्फत प्रदान केली जाईल, सर्व बंदरांवर सीआयएसएफचे गणवेषातील सुरक्षा रक्षक तैनात असतील. स्थानिक ठिकाणांना भेटी देणाऱ्या तसेच रात्रभर बंदरात मुक्काम करणाऱ्या प्रवाशांनी पुरेशी सुरक्षा पुरवली जाईल.

प्रवाशांची हाताळणी करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला विशिष्ट शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान केले जाईल. सागरी पर्यटन अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

सागरी पर्यटनाचे महत्व लक्षात घेत, प्रवाशांच्या आवश्यकता पूर्ण करणाऱ्या शिफारसींचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीने याबाबतच्या शिफारसी केल्या आहेत.

Embeded Object