अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला; ६ मृत्युमुखी
 महा त भा  10-Jul-2017


 

अनंतनाग: अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला झाला असून, या हल्ल्यात ६ यात्रेकरू मृत्युमुखी पडले आहेत. सुरुवातीला यात २ जण जागीच ठार झाले होते, ४ नागरिक गंभीर जखमी होते, मात्र उपचारांतर्गत त्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यात्रेकरूंवर अतिरेक्यांद्वारे दिवसा-ढवळ्या गोळीबार करण्यात आला होता. त्याच बरोबर बंतीगू भागात पोलीसांवर देखील हल्ला करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. जम्मू येथून अमरनाथ यातत्रेतील भक्त रविवारी प्रस्थान करत होते, ही यात्रा जम्मू येथे सुरक्षेच्या करणामुळे एका दिवसासाठी रोखली गेली होती, मात्र सोमवारी ती पुढे प्रस्थान करू लागली होती.

या संपूर्ण यात्रेत १ लाखापेक्षा अधिक यात्रेकरू दरवर्षी सामील होतात, त्यांची सुरक्षेची जबाबदारी लष्कराकडे सोपविण्यात आली होती. बुरहान वाणीला लष्कराकडून कंठस्नान घातल्यानंतर १ वर्षाच्या कालावधी नंतर तणाव कमी झाला आहे, मात्र तरी देखील सुरक्षेचा मोठा प्रश्न होताच, त्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाने त्याची काळजी घेतली होती, मात्र तरी देखील या दुर्घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्याच बरोबर मृतांच्या परिवाराचे देखील सांत्वन केले आहे.

Embeded Object