दीपिकाला ‘हे’ गाणं सध्या भलतच आवडलयं...
 महा त भा  10-Jul-2017


बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना काय आवडतं, काय नाही याची माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडिया हे आता एक चांगलच प्रभावी माध्यम झालेलं आहे. आणि त्यामुळेच हे सेलिब्रेटी लोक सुद्धा त्यांच्या चाहत्यांसाठी काही ना काही नवीन खाद्य यामाध्यमातून पुरवत असतात. आता हेच बघा ना, दीपिका पादुकोणला सध्या कोणतं गाणं आवडत हे तिच्या एखाद्या चाहत्याला कोणी विचारलं असतं तर त्याच उत्तर त्याला पटकन देता आलं नसत, पण काल रात्री दीपिकाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने ते आता सहज शक्य झालय.


Embeded Object

दीपिकाची संगीताची आवड आपण सगळे जाणतोच, तिला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला आवडते. सध्या सर्वत्रच चर्चेत असणारं गाणं दीपिकाचीही पसंती मिळवून गेलयं. ‘जब हॅरी मेट सेजल’ या इम्तियाज अलिच्या आगामी चित्रपटातील ‘बीच बीच मैं...’ हे गाणं दीपिकाला प्रचंड आवडलं असल्याची प्रतिक्रिया तिने सोशल मीडियावरून नोंदविली आहे. गेल्या आठवड्यात अरिजित सिंग व शाल्मली खोलगडे यांच्या आवाजातील हे गाण प्रदर्शित झाले असून प्रितमने याला संगीत दिले आहे. शाहरूख खान व अनुष्का शर्मा यांच्यावर हे गाणं चित्रित झालेल आहे.


दीपिकाने या गाण्याला पसंती देत केलेल्या पोस्टला शाहरूख खानने उत्तर देखील दिल आहे. तो म्हणतोय, ‘आज तुला या चित्रपटातील पुढचं गाण देखील पाठवतोय. तुला हे ही गाणं आवडेल अशी अपेक्षा करतो. सफर’

Embeded Object