सिद्धार्थराव, ‘असले’ चित्रपट नाही हो चालत आता...
 महा त भा  10-Jul-2017


नायकाची दुहेरी भूमिका, मग त्यामुळे नायिका आणि खलनायक यांचा होणारा संभ्रम त्यातून निर्माण होणारे विनोद व अविश्‍वसनीय हाणामारी अशा सरधोपट कथेवर आधारीत असणारे चित्रपट चालण्याचे दिवस आता राहिले नाहीत. भलेही यात कितीही चकचकीत पणा आणा, परदेशात चित्रण करा, अ‍ॅक्शनचे नवे प्रकार दाखवा किंवा हॉट रोमँटिक सीन्सचा माराही करा; पण याला प्रेक्षक कंटाळले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस यांची प्रमुख भूमिका असणार्‍या ‘ए जंटलमेन’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. राज निडीमोरू आणि कृष्णा डी. के. यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलर बघितल्यावर साधारण या चित्रपटाची कथा वरील गोष्टींवरच आधारित असल्याचे लक्षात येते. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Embeded Object

सिद्धार्थने यामध्ये ऋषी आणि गौरव अशा दोन भूमिका वठविल्या आहेत. काव्याच्या भूमिकेत जॅकलिन आहे तर खलनायक म्हणून आपला ‘येडा अण्णा’ म्हणजेच सुनील शेट्टी (या चित्रपटातून मनोरंजनाची जी काही थोडी अपेक्षा आहे तो हाच माणूस पूर्ण करू शकेल.) आपल्याला दिसेल. आश्‍चर्य म्हणजे सुप्रिया पिळगावकर नायिकेच्या आईच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थचे ‘डोले-शोले’ जबरदस्त दिसतायत आणि जॅकलिन सुद्धा हॉट दिसतीये पण अभिनयाच काय, असा प्रश्‍न हा ट्रेलर बघितल्यावर सुद्धा पडतोच? याच उत्तर 25 ऑगस्टला मिळेल परंतु ते ही फार काही समाधानकारक असेल अस वाटत नाही!