जिल्हयात ई-पॉस मशिनद्वारे १०० टक्के अन्न धान्य वितरण - पालकमंत्री डॉ.रणजित पाटील
 महा त भा  09-Jun-2017

 


अकोला जिल्हयात १०५० रास्तभाव दुकानदारा कडून ई-पॉस मशिनचा वापर करण्यात येणार आहे. येत्या जुलै अखेर पर्यंत सर्व रेशन कार्ड हे आधारशी  लिंक होणार असून त्यानंतर अन्नधान्य  वितरण  व्यवस्थेत फार मोठया प्रमाणात पारदर्शकता येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. शासनाच्या पुरवठा  विभागाकडुन जिल्हयात ई-पॉस मशिनद्वारे १०० टक्के अन्न धान्य  वितरण होत असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  दिली.

शासकीय नोकरीमध्ये असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी आपल्याकडे असलेला केशरी किंवा पिवळे राशन कार्ड परत करुन शुभ्र कार्ड काढून घ्यावे अन्यथा अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

यावेळी रास्त भाव दुकानदारांनी आपल्या समस्या पालकमंत्री यांच्याकडे सांगितल्या त्यांच्या तक्रारीचे निरसन वेळीच  पालकमंत्री यांनी केले. यावेळी जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे  जिल्हाध्यक्ष शत्रृध्न मुंडे यांचेसह  संघटनेचे पादाधिकारी  व दुकानदार उपस्थित होते.