रायगडावर आज शिवराज्याभिषेकाची धूम
 महा त भा  06-Jun-2017


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या '३४३ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या उत्सवानिमित आज अवघा किल्ले रायगड भगव्या पताकांनी उजळून निघाला आहे. राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून शिवप्रेमींनी रायगडावर गर्दी केली आहे. कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे भोसले हे देखील या सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थित राहिली राहिले आहेत.


राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यासाठी गेल्या आठड्याभरापासूनच रायगडावर तयारी सुरु झाली होती. काल मध्यरात्री संपूर्ण रायगड दिव्यांचा प्रकाशात उजळून निघाला होता. किल्ल्यावर अनेक ठिकाणी फुलांची तोरणे उभारण्यात आली आहेत, अनेक ठिकणी नक्षीदार रांगोळी रेखाटण्यात आली आहे, जागोजागी मंडप तसेच दीपांची आरास करण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमी खांद्यावर भगवा पताका घेऊन रायगड चढून आले आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला आहे.


यंदाचा 'शिवराज्याभिषेक सोहळा' सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ज्येष्ठ विचारवंत संभाजी भिडे गुरुजी यांनी यंदाच्या 'शिवराज्याभिषेक दिनी' राजगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासनाची स्थापना करण्याचा पण घेतला आहे. लोक वर्गणीतून तसेच जन सहभागातून या संकल्पाची पुर्ती करण्याचा निर्णय भिडे गुरुजी यांनी केला आहे. यासाठी भिडे गुरुजी आज सर्व शिवभक्तांना आवाहन करणार आहेत.