गडकरी यांची वचनपूर्ती, अवघ्या १६५ दिवसांमध्ये सावित्रीवरील नवीन पुलाचे उद्घाटन
 महा त भा  05-Jun-2017

महाड येथील सावित्री नदीवर अवघ्या १६५ दिवसांमध्ये उभारण्यात आलेल्या नव्या उच्च पातळी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. गेल्या वर्षी महाड येथील दुर्घटनेत सावित्री नदीवरील पुलाबरोबर दोन एसटी बसेस आणि एक तवेरा वाहून गेली होती. त्यावेळी गडकरी यांनी पुढील सहा महिन्यात सावित्री नदीवर नवीन पूल उभारण असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अवघ्या १६५ दिवसांमध्ये या नव्या पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले.

सावित्रीवरील घटना घडल्यानंतर १५ डिसेंबर २०१६ रोजी या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आणि विक्रमी वेळेत म्हणजे ३१ मे २०१७ रोजी पुलाचे काम पूर्ण झाले आहे.तीन पदरी असलेल्या या पुलाची रूंदी १६ मीटर असून पुलाची लांबी २३९ मीटर एवढी आहे.अवघ्या १६५ दिवसात काम पूर्ण झालेल्या या पुलासाठी ३५.७७ कोटी रूपये खर्च आलेला आहे.जुना पूल पडल्यानंतर अंधारामुळे काही दिसलं नाही आणि वाहनं सरळ नदीत पडली,याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुलावर रात्रीसाठी पथदीप सुविधा आणि पदपथ व्यवस्था केली गेली आहे.तसेच पूर गजर प्रणाली,गंजरोधक सळ्या,रस्ता सुरक्षा उपाययोजना,आदि अत्याधुनिक सुविधाही करण्यात आलेल्या आहेत.मुंबई-गोवा महामार्गाच्यादृष्टीने या पुलाचे अनन्यसाधाऱण महत्व आहे.त्यामुळं पावसाळ्यापुर्वी  नवीन पूल वाहतुकीस खुला होत असल्याने पावसाळ्यात होणार्‍या वाहतूक कोंडीपासून कोकणवासियांची सुटका होणार आहे त्यामुळं कोकणवासिय जनता नितीन गडकरी आणि सरकारला धन्यवाद देत आहे.

 

Embeded Object


याच बरोबर रायगड जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी एकूण ९ हजार ९३५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यातील ४ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे दुपदरीकरण तसेच नवीन रस्त्यांच्या उभारणीवर भर देण्यात येणार आहे.

Embeded Object

Embeded Object

Embeded Object


'२०१८ पर्यंत कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणत रस्तांचे जाळे कोकण विभागात उभारण्यात येणार आहे. बाबसाहेब आंबेडकर यांच्या गावाला थेट रायगड जोडण्यासाठी नवीन रस्ता उभारण्यात येणार आहे.' अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच ६० वर्षांमध्ये रखडलेली अनेक कामे सध्याच्या सरकारने अत्यंत जलद गतीने पूर्ण केली आहेत, असेही ते म्हणाले.


गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सावित्रीला आलेल्या पूरामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली होती. नदीवरील कमकुवत झालेल्या पुलामुळे दोन एसटी बसेस आणि एक तवेरा वाहून गेल्यामुळे तब्बल ४० हून नागरिकांचा बुडून मृत्यू झाला होता. या भयानक दुर्घटनेमुळे उभा महाराष्ट्र हादरून गेला होता.