आज गुगल डूडलकडून अभिनेत्री नूतन यांना मानवंदना
 महा त भा  04-Jun-2017

 

जगातील कोणतीही माहिती असो ती गुगलवर मिळते असे म्हणतात, मात्र जगातील प्रसिद्ध व्यक्तींची माहिती देखील गुगल सतत ठेवत असतो हे आजच्या गुगल डूडलवरून आपल्याला लक्षात येणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नूतन हिला आज गुगलने डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे.

 

दिवंगत अभिनेत्री नूतनचा आज ८१ वा जन्मदिवस असल्याने गुगलने डूडलच्या माध्यमातून ही अनोखी मानवंदना दिली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नूतन हिला ओळखले जात होते. नूतन हिने तब्बल सहा वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळवले होते. नूतन ही मिस इंडिया खिताबची मानकरी देखील झाली होती, हा खिताब प्राप्त करणारी नूतन ही पहिलीच भारतीय महिला होती.

 

मात्र या देखण्या आणि उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीला शेवटी कॅन्सरमुळे या जगाला सोडून जावे लागले २१ फेब्रुवारी १९९१ रोजी नूतन ही जगाला सोडून गेली. नूतन हिने हिंदी चित्रपट सृष्टीत ५० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन आणि में तुलसी तेरे आंगण की अश्या प्रसिद्ध चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. आज तिच्या याच कारकीर्दसाठी गुगलने तिला उत्तम अशी मानवंदना दिली आहे.