इस्रो करणार सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण
 महा त भा  04-Jun-2017भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आता आणखी एक गगनक्षेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे. जीएसएलव्ही-मार्क III या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचे उद्या इस्रोकडून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी साडे पाच वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अवकाश केंद्रावरून या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येणार आहे.


जीएसएलव्ही-मार्क III हे आतापर्यंतचे इस्रोचे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र असणार आहे. तसेच याची वाहक क्षमता देखील सर्वात अधिक असणार आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मार्क-III ची चार ते पाच टन इतकी आहे. क्षेपणास्त्राद्वारे जीसॅट-१९ या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा बेत इस्रो आखत आहे. जीसॅट-१९ चे अंदाजे वजन ३.५ टन इतके असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या क्षेपणास्त्रात दोन इंजिन बसवण्यात आले असून ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. 


मार्क-III ची चाचणी यशस्वी झाल्यास हे इस्रोचे खूप मोठे यश मानावे लागेल. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्यास इस्रो बाहेरील देशांचे वजनाने मोठे असलेल्या उपग्रहांचे देखील प्रक्षेपण करू शकणार आहे. तसेच इस्रोच्या आगमी अवकाश मोहिमांसाठी देखील याच खूप मोठा फायदा होणार आहे.