जीएसटी बैठक - सोन्याचे दर निश्चित
 महा त भा  03-Jun-2017


 

आज जीएसटी ची १५ वी बैठक राजधानी नवी दिल्ली येथे संपन्न झाली आहे. त्यात सोन्यापासून बिडी, सिगारेट पर्यंतचे सर्व वस्तूंचे दर ठरले आहे. सोन्याचे बिस्कीटवर १८% कर आकाराला जाणार असून इतर सोन्यावर ३% कर आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक संपन्न झाली असून यात पादत्राणे, टेक्सटाईल्स, बिस्कीट, तंबाखूजन्य पदार्थांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. ५०० रुपयापेक्षा कमी दाराचे पादत्राणेवर ५% कर आकाराला जाईल, तर ५०० पेक्षा अधिक दाराच्या पादत्राणेवर १८% कर आकारणी जीएसटी अंतर्गत होईल.

आयत्या कपड्यांवर १२% कर निश्चिती झाली असून सुती कापड व इतर टेक्सटाईल्सवर ५% कर निश्चिती यावेळी करण्यात आली आहे. त्याच बरोबर बिडी महागणार असून यावर सर्वाधिक २८% कर आकारणी निश्चित केली गेली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी बैठकीदरम्यान जीएसटी मंडळाने १२०० वस्तूंवरील कराची निश्चिती केली आहे. त्याच बरोबर ५०० सेवांवर देखील करांची निश्चिती करण्यात आली असून त्यांचे ५%, १२%, १८% व २८% अशा विभागात वर्गीकरण केले आहे.

Embeded Object