संजय गांधींना तुम्ही कधी कव्वाली ऐकताना पाहिलय का?
 महा त भा  28-Jun-2017


इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत, 1975 मध्ये त्यांनी पुकारलेल्या आणीबाणीचे काळ चालु आहे. आजुबाजूचे वातावरण तणावपूर्ण झाले आहे आणि याच सगळ्या परिस्थितीत इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी कव्वाली ऐकत बसले आहेत... हे दृश्य तुम्ही कधी कुठल्या व्हिडिओ मधून बघितलय का? अर्थात खर्‍या आयुष्याचा विचार केला तर याचं उत्तर नाही असच असणार... पण अशा प्रकारचा ड्रामा मधुर भांडारकरच्या ‘इंदु सरकार’ या आगामी चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे.

‘इंदु सरकार’मधील ‘चढता सुरज’ हे कव्वाली स्वरूपातील गाणे आज प्रसिद्ध झाले आहे. या गाण्याच्या सुरूवातीलाच असं दाखविण्यात आलं आहे की, संजय गांधी आपल्या काही मित्रांसोबत एका आलीशान मैफीलीत कव्वाली ऐकायला बसले आहेत. कव्वालीचे सुरूवातीचे काही बोल ऐकल्यावरच पुन्हा एकदा भांडारकरने आपला निशाणा कोणावर आहे ते दाखवून दिले आहे. “आज जवानी पर इतरा ने वाले कल पछताये गा, चढता सुरज धिरे धिरे ढलता हैं ढल जाए गाँ...’’ असे या गाण्याचे बोल आहेत. अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थेला आणि सर्वोच्च नेत्यांना काहीतरी सांगण्याचा या गाण्यातून प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.

Embeded Object

या गाण्याविषयी ट्विटरवरून रसिकांना प्रतिक्रिया देताना मधुर म्हणाला, “सत्तरच्या दशकात ‘चढता सुरज’ हे गाणं अतिशय प्रसिद्ध झालं होतं याच गाण्यावर अन्नुमलिक आणि मी पुन्हा काम करून हे फिलॉसॉफिकल गाणं नव्याने आपल्या समोर सादर केलं आहे. बर्‍याच कालावधीपासून हिंदी चित्रपटांमध्ये कव्वाली गाणं पाहायला मिळालेलं नाही. ‘चढता सुरज’ मुळं ही कमतरता भरून निघेल.’’

Embeded Object

‘इंदू सरकार’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या विषयी वाद सुरू झाला आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप आणला असून मधुर भांडारकरने मात्र चित्रपटावर आक्षेप घेण्यासारख्या कोणत्याही गोष्टी आम्ही दाखविल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. नील नितीन मुकेश याने या चित्रपटात संजय गांधी यांची भूमिका साकारली असून आत्तापासूनच त्याच्या कामाची प्रशंसा होत आहे. त्याचबरोबर किर्ती कुल्हेरीला देखील या चित्रपटातून एक दमदार भूमिका मिळाली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘चढता सुरज’ या गाण्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.

Embeded Object