चीनने विकसित केली नवीन बुलेट ट्रेन
 महा त भा  26-Jun-2017


तंत्रज्ञानाच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकासाची नवीन शिखरे चढत असलेल्या चीन आता वाहतूक क्षेत्रात आणखी एक नवीन कामगिरी केली आहे. देशातील दळणवळण व्यवस्थेला आणखीन गती देण्यासाठी चीनने नुकतीच एक नवीन बुलेट ट्रेन तयार केली असून ही बुलेट ट्रेन ताशी ४०० किमी इतक्याने वेगाने प्रवास करू शकते. नुकतीच चीनने शांघाई ते बीजिंग या दरम्यान या ट्रेन यशस्वी चाचणी घेतली आहे.


या ट्रेनचे चायनीज भाषेत 'फुझिंग' असे नामकरण करण्यात आले असून चीनमधील आतापर्यंतची ही सर्वात वेगवान बुलेट ट्रेन असणार आहे. या ट्रेनचा टॉप स्पीड ताशी ४०० किमी इतका असून बीजिंग ते शांघाई यांच्यातील अंतर ही ट्रेन ताशी ३५० किमी वेगाने पार करणार आहे. या ट्रेनच्या निर्मित्त अत्यंत अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी ट्रेनमधील आसनव्यवस्था देखील त्यांत उच्च दर्जाची बनवण्यात आली आहे.


क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीन हा जगातील चौथा सर्वात मोठा देश आहे. त्याच बरोबर रेल्वेचे सर्वाधिक जाळे असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे आपल्या रेल्वे व्यवस्थेमध्ये चीन सातत्याने प्रगती करण्याच्या प्रयत्नांत असतो. या अगोदर चीनने २०११ मध्ये तशी ३०० किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन विकसित केली होती. तसेच आगामी काळात तशी ५०० किमी वेगाने धावणारी रेल्वे विकसित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे.