चीनमधील भूस्खलनात १०० नागरीक ठार
 महा त भा  24-Jun-2017


 

चीनमधील ‘सिचुआन’ या प्रांतात डोंगरावरील भूस्खलनामुळे १०० लोक ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये ४० लोकांची घरे नष्ट झाली आहेत. अनेक लोक बेघर झाले आहेत. भूस्खलनामुळे तेथील जनतेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण बेपत्ता झाले असून नागरिकांनी मदतीसाठी आवाहन केले आहे.

चीनच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे पहाडी भूस्खलन होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. भूस्खलनामुळे तेथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांची घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या घटना अनेक भागात घडत आहेत. भारतात अरुणाचलप्रदेश, मेघालय, उत्तराखंड तसेच आसाम या ठिकाणी अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. मान्सून येऊन थोडे दिवस झाले असतानाच ही परिस्थिती असेल तर संपूर्ण वर्षा ऋतुत परिस्थिती काय असणार? हा विचार चिंताजनक आहे.