शेतकऱ्यांशी चर्चेविना संरक्षण विभागाचा निर्णय अन्यायकारक - विखे पाटील
 महा त भा  23-Jun-2017

 

शिवसेनेने राजकारण करण्याऐवजी ‘निवळे’करांना न्याय मिळवून द्यावा

रायगड येथील निवळेमध्ये विमानतळ जमीन अधिग्रहण प्रकरणी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले की, दडपशाही व दंडेली करून निवळे येथील गावकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. संरक्षण खात्याने शेतकऱ्यांशी चर्चा न करता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेणे अन्यायकारक आहे. सरकारने सामंजस्य व संयम दाखवून ग्रामस्थांशी संवाद साधण्याची गरज आहे. निवळे विमानतळ प्रकरणी निवळेतील स्थानिक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

“खासदार व आमदार शिवसेनेचे असून ते सरकारमधील घटक पक्ष आहे. त्यामुळे आंदोलन पेटल्यानंतर राजकारण करण्याऐवजी सरकार म्हणून त्यांनी निवळेच्या गावकऱ्यांना न्याय का मिळवून दिला नाही”, अशी संतप्त विचारणाही त्यांनी यावेळी केली. विखे पाटील यांनी कल्याण येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये जाऊन या आंदोलनातील जखमी गावकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कल्याण येथील फोर्टीस हॉस्पिटल व डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटलला जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्याही प्रकृतीचीही विचारपूस केली.

निवळेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही या गावकऱ्यांनी केली आहे. त्यावर या प्रकरणाचा पाठपुरावा करून विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

निवळे येथील