आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिल्पा शेट्टी शिकवणार एक कठीण आसन
 महा त भा  21-Jun-2017




योगासने आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. याने आपण निरोगी राहतो, तसेच आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचे असतात. मात्र कठीण आसने करताना शरीरावर ताण येवू शकतो. त्यामुळे ही आसने करताण्यासाठी खूप मेहनत आणि सराव लागतो. असेच एक कठीण आसन 'बकासन' आजच्या जागतिक योगदिनानिमित्त प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

Embeded Object



आजच्या दिवसाचे औचित्य साधून शिल्पा शेट्टी ने ट्विटरच्या माध्यमातून बकासन करत असतानाचा व्हिडियो पोस्ट केला आहे. तसेच हे आसन करण्यासाठी खूप सराव करावा लागला असे देखील तिने सांगितले आहे. नेटकऱ्यांनी घरी सराव करताना सांभाळून करावा. असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

आज जागतिक योगदिनानिमित्त अनेक दिग्गजांनी विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये सर्व केंद्रीय आणि राज्यांच्या मंत्र्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश होता.