जिल्ह्या नियोजन बैठकीत ५ देवस्थानांना 'क वर्ग' दर्जा
 महा त भा  20-Jun-2017


जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

जिल्हा नियोजन समितीची बैठक महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार,विमुक्त जाती, भटक्याजमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनीताई विखे पाटील, महापौर श्रीमती सुरेखा कदम, खासदार दिलीप गांधी , जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


संगमनेर तालुक्यातील श्री हरी पुरषोत्तम मंदीर कासार दुमाला, श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट संगमनेर खुर्द, श्री प.पु.अमरगिरी महाराज खानेश्वर देवस्थान सायखिंड, पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळेश्वर देवस्थान विरोली व श्रीमरापूर तालुक्यातील श्री गणेश देवस्थान, गणेशखिंड वांगी बु. या यात्रास्थळांना क वर्ग दर्जा प्रधान करण्यात आला. तसेच शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मौजे घोटण येथे स्थलांतरीत करण्याबाबत या बैठकीत मान्यता देण्यात आली.


या बैठकीस आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार विजय औटी, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार संग्राम जगताप, आमदार वैभव पिचड, यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम , प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. व्हरसाळे आदिसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.