नासा राबवणार जगातील पहिली सौर मोहीम
 महा त भा  02-Jun-2017


 

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा २०१८ साली जगातील पहिली सौर मोहीम करणार आहे. सूर्यावरील परिस्थिती कशी असेल, त्यातील भौतिक, रासायनिक बदल कसे होत असतील? असे अनेकानेक प्रश्न मानवाच्या अजूनही उत्सुकतेचा विषय ठरतात. त्याचे नेमके उत्तर शोधण्यासाठीची ही मोहीम आहे.

नासाने या मोहिमेला 'द पार्कर सोलार प्रोब' असे नाव दिले आहे. हे नाव सुप्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ 'युजीन पार्कर' यांना समर्पित करत दिले गेले आहे. नासाने पहिल्यांदाच अशा मोहिमेला व्यक्तीचे नाव दिले आहे. यापूर्वी कोणत्याही व्यक्तीच्या नावाने मोहीम केलेली नाही.

Embeded Object

'द पार्कर सोलार प्रोब' हे सूर्याच्या पृष्ठभागाच्या अत्यंत जवळ जाणार आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे. सूर्याच्या उष्णतेच्या दृष्टीने सर्वच प्रावधान यात केले जाणार आहे. या मोहिमेत नासाचे काही शास्त्रज्ञ देखील जाणार आहे. चक्क सूर्यावर जाणारी ही पहिलीच माणसे असतील.

३१ जुलै २०१८ रोजी हे अंतराळ यान प्रक्षेपित होईल, त्या आधी २० दिवस याची संपूर्ण तयारी पूर्ण केली जाईल. ही मोहीम जगासाठी उत्सुकतेची ठरणार असून, बऱ्याच अंशी यात अनेक बाबतीत अनिश्चितता देखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले असून, मानव जातीला यातून खूप काही मिळणार आहे.