पृथ्वी II क्षेपणास्त्रबद्दल जाणून घ्या या ५ गोष्टी
 महा त भा  02-Jun-2017


 

१. पृथ्वी II हे क्षेपणास्त्र पूर्णपणे डीआरडीओने विकसित केले आहे. क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आला आहे.

२. याची पहिली नमुना चाचणी १९९६ साली घेण्यात आली होती, आणि क्षेपणास्त्र विकास पूर्ण २००४ साली झाला होता.

३. हे छोट्या अंतरावरील पृष्ठभागावर सोडले जाणारे क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला ३५० किमी एवढा असून ५०० ते १ हजार किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.

४. या क्षेपणास्त्राचा विकास भारतीय वायू दलच्या उपयोगासाठी करण्यात आला होता.

५. आज याची यशस्वी चाचणी झाली आहे. अशा चाचण्या क्षेपणास्त्राची कार्यक्षमता तपासण्यासाठी केली जाते. या आधी २८ मार्च २०१४ साली अशी चाचणी घेण्यात आली होती.