कोण आहेत रामनाथ कोविंद?
 महा त भा  19-Jun-2017

 

रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थांत एनडीएचे राष्ट्रपती पदाचे आगामी उमेद्वार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ते सध्या बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. ७१ वर्षीय रामनाथ कोविंद हे २३ जूनला राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरणार आहेत. रामनाथ कोविंद हे मुळचे उत्तर प्रदेशमधील कानपूरचे आहेत.

जाणून घेवूयात कोण आहेत रामनाथ कोविंद : 

१. व्यवसायाने वकील असलेले रामनाथ कोविंद यांनी १९९४-२००० आणि २०००-२००६ सालात उत्तर प्रदेश राज्यसभेचे खासदार म्हणून पद सांभाळले होते.

२. रामनाथ कोविंद हे १९९८-२००२ या काळात भारतीय जनता पक्षाच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते.

३. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेपदाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती.

४. रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला.

५. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात वकिल म्हणून कामाला सुरुवात केली.

६. कोविंद यांनी बारा वर्षं राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला.

७. १९८६ मध्ये त्यांनी दलित वर्गातील कायदेशीर मदत मंडळचे महामंत्री म्हणून देखील पदभार सांभाळला आहे. 

८. त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात मागासवर्गीयांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप संघर्ष केला आहे. 

९. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतील कुटुंबातून येवून देखील त्यांनी स्वकर्तृत्वावर यश मिळवले आहे.