भारताच्या खेळाडू वृत्तीचे जगभरातून कौतुक
 महा त भा  19-Jun-2017चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारताचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला तब्बल १८० धावांनी हरवत ८ वर्षांनी भारतावर विजय मिळवला. याचं जितकं दु:ख संपूर्ण देशवासियांना झाले आहे, त्याहून कितीतरी जास्त दु:ख भारतीय संघाला झाले असणार, मात्र तरी देखील आपले दु:ख व्यक्त न करता भारताने आपल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन जगाला दिले. पाकिस्तानी खेळाडूंच्या उत्तम प्रदर्शनाची भारताने प्रशंसा केली तसेच त्यांच्या सोबतच्या वादगणुकीत देखील भारताचा सन्मान दिसून आला.

Embeded Objectया खेळाडू वृत्तीची प्रशंसा आयसीसीने देखील केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामन्यानंतर झालेल्या हास्य संवादाचा एक व्हिडियो आयसीसीने ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये युवराज सिंह विराट कोहली आणि पाकिस्तानी खेळाडू आपसात हास्य संवाद करताना दिसून येत आहे. आयसीसीने या व्हिडियोला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' असे नाव दिले आहे.

सामन्यानंतर विराट कोहली याने भारतीय संघाच्या चुका मान्य करत पाकिस्तानी संघाची प्रशंसा केली आहे. तो म्हणाला की, "पाकिस्तानी संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. त्यांचा दिवस असेल तर त्यांच्यापुढे कुठलाही संघ टिकू शकणार नाही." एकूणच कालच्या खराब प्रदर्शनानंतर देखील भारताने दाखवलेल्या उत्तम खेळाडू वृत्तीचे जगभरातून कौतुक करण्यात आले आहे.