पाकिस्तानच्या विजयावर दिग्गजांच्या प्रतिक्रिया
 महा त भा  19-Jun-2017

लंडनमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील कालच्या अंतिम सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने भारतावर तब्बल १८० धावांनी विजय मिळवला असून पाकिस्तानने भारताला आयसीसी ट्रॉफीत तब्ब्ल आठ वर्षांनंतर हरवले आहे. भारताकडून हार्दिक पांड्याने एकाकी झुंज देत ७६ धावांची खेळी केली. परंतु त्याच्या या झुंजार खेळीचा मात्र काहीही उपयोग झाला नाही.


पाकिस्तानच्या या विजयानंतर पाकिस्तान संघावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर क्रिकेट विश्वातील काही दिग्गजांच्या खेळाडूंनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूयात :

वीरेंद्र सेहवाग :

सोशल मिडीयावर सतत चर्चेत असलेला आणि भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'आजच्या जबरदस्त विजयाबद्दल पाकिस्तान संघाचे अभिनंदन. पाकिस्तान संघाने चांगला खेळी केली आहे. त्यामुळेच ते विजयाचे दावेदार ठरले. हा विजय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे.'

Embeded Object
वसीम आक्रम :

'खूपच शानदार ! टीम ग्रीन चा विजय अविश्वसनीय असा आहे. ११९२ च्या वर्ल्डकपची प्रचीती आली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे' असे मत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम आक्रमने आपल्या ट्वीटर च्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

Embeded Object

 

शहीद आफ्रिदी :

पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज आणि माझी कर्णधार शहीद आफ्रिदी याने देखील पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला ‘ही कामगिरी दोन्ही देश कायमस्वरूपी लक्षात ठेवतील. पाकिस्तान संघाने खूप चांगला खेळ करत ही चॅम्पियन्स ट्रॉफीवर संस्मरणीय केली आहे.

Embeded Object

 

कुमार संगकारा :

श्रीलंकेचा माझी कर्णधार संगकारा म्हणाला कि, ‘पाकिस्तान संघ हिम्मत आणि विश्वासाने खेळले असून त्यांची कालची खेळी ही अविश्वसनीय अशीच होती.'

Embeded Object


शेन वॉर्न :

पाकिस्तानच्या आश्चर्यकारक विजयाबद्दल संघाचे अभिनंदन. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली' असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केले.

Embeded Object