स्वामी आत्मास्थानंद यांचे निधन
 महा त भा  19-Jun-2017


रामकृष्ण मिशनचे प्रमुख तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अध्यात्मिक गुरु स्वामी आत्मास्थानंद यांचे काल प्रदीर्घ आजारामुळे कोलकत्ता येथे निधन झाले आहे. ते ९९ वर्षांचे होते. कोलकत्ता येथील रामकृष्ण सेवासदन रुग्णालयात त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामींच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. स्वामींच्या जाण्याने माझे खूप मोठे वयक्तिक नुकसान झाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी आपण त्यांचा सोबत राहिलो असून त्यांच्या आशीर्वाद सतत आपल्या स्बोत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच स्वामींनी केलेल्या कार्यासाठी येणारी पिढी त्यांचे सतत स्मरण करेल असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

Embeded Object

Embeded Object


आजारपणामुळे स्वामींना २०१५ पासून सेवासदन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर काल रात्री रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामींच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर देशभरातून भाविकांनी कोलकत्ताकडे येण्यास सुरुवात केली आहे. कोलकत्तामधील भाविकांनी देखील स्वामींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रामकृष्ण मठाच्या आवारात गर्दी केली होती.

Embeded Object

Embeded Object


स्वामींचा जन्म १९१९ मध्ये ढाकाजवळील सब्जापूर येथे झाला होता. त्यानंतर आपल्या वयाच्या २२ व्या वर्षापासून ते कोलकत्त्यातील बेलूर मठाच्या संपर्कात आले. १९३८ मध्ये त्यांनी स्वामी बजनानंद यांच्याकडून गुरुमंत्र आणि दीक्षा घेतली होती. यानंतर २००७ मध्ये त्यांची निवड रामकृष्ण मिशनच्या अध्यक्ष स्थानी करण्यात आली होती. पंतप्रधान