पोर्तुगाल येथील वणव्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ
 महा त भा  19-Jun-2017काल पोर्तुगाल येथे वणवा पेटल्यानो पोर्तुगालवर मोठे संकट उद्भवले आहे. पोर्तुगाल येथील पेड्रोगन ग्रैंड या जंगलात वणवा पेटल्याने ६० नागरिक ठार झाल्याची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त ५० लोक जखमी झाले आहेत. १८ लोक कारमध्ये बसले असतानाच जळाले आणि मृत्यूमुखी पडले. अनेक लोक बेघर झाले आहेत. या घडलेल्या भीषण घटनेमुळे पोर्तुगाल सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

काल मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा २४ होता तर आज हा आकडा ६० वर पोहचला आहे. कमी वेळातच हा वणवा संपूर्ण जंगलात पसरला. आग कोणत्या कारणाने लागली आहे,याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

पोर्तुगाल येथील मेअर स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या भागात जंगलामुळे आग लागते या आधीही अनेक अश्या घटना घडल्या आहेत .काल मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा २४ होता तर आज हा आकडा ६० वर पोहचला आहे. वणवा पेटला त्यादिवशी पोर्तुगाल येथे तापमान ४० डिग्री होते, तर गरम वारे देखील वाहत होते, त्यामुळए तापमानात अचानक वाढ झाल्याने हा वणवा पेटला असल्याचे सांगण्यात येत आहे.