हिंसक आंदोलन सहन केले जाणार नाही : ममता बॅनर्जी
 महा त भा  19-Jun-2017राज्यात हिंसा होत असून सुद्धा बॅनर्जी नेदरलँड्स दौऱ्यावर

वेगळ्या राज्याच्या मागणीने पेटून उठलेल्या दार्जिलिंगमध्ये परिस्थिती सामान्य पदावर येण्याचे नाव घेत नाहीये. एका जाबूला विम गुरांग आपल्या मागण्या आणि आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नाहीये, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, "हिंसक आंदोलन सहन केले जाणार नाही, माझ्या मंत्रीमंडळातील मंत्री संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत." असे जाहीर केले आहे. कुठल्याही बाजूतर्फे तडजोड करण्यास तयारी नसल्याने हे आंदोलन आणखीनच चिघळत चालले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेतला आहे. ' वी वॉन्त्यांट गोरखा लँड' च्या घोषणा देत आंदोलकांनी रॅली काढल. यामध्ये त्यांनी 'ममता बॅनर्जी गो बॅक, ममता बॅनर्जी हाय हाय, बंगाली हाय हाय' अशा घोषणा देखील दिल्या आहेत. थांबविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुगॅसचा वापर करावा लागतोय, अनेक पर्यटक अडकले आहेत. मात्र इतके सगळे होत असतानाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या नेदरलँड्स येथील दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. मंत्रीमंडळाला या संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवण्याचे आदेश देवून ममता बॅनर्जी निघाल्या आहेत. मात्र यामुळे आंदोलकांमध्ये आणि जनतेमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ममता बॅनर्जी यांनी बिमल गुरुंग यांच्यावर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप लावला होता, मात्र 'गोरखालँड' साठी सुरु झालेल्या या आंदोलनाला ममता बॅनर्जी वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नात आहेत असे मत गुरुंग यांनी व्यक्त केले आहे.