रशिद लतिफने भेजा हैं मोहब्बत का पैगाम...पाकिस्तानच्या विजयानंतरचा लतिफचा व्हिडिओ होतोय व्हायरल
 महा त भा  19-Jun-2017


चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या मालिकेत साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. त्यानंतर उत्यांतफेरीच्या सामन्यात बांगलादेशला हारवून भारत अंतिम फेरीत पोहचला व त्यांचा सामना पाकिस्तानशी निश्‍चित झाला. दरम्यानच्या काळात भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग व पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफ यांच्यामध्ये सोशल मीडियावरून प्रचंड मोठा वादंग झाला. त्यामुळे साहजिकच अंतिम सामना जिंकल्यावर या दोघांच्याही प्रतिक्रया काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा अक्षरश: दारूण पराभव करून सुद्धा रशिद लतिफने हा वाद पुन्हा पेटेल अशी प्रतिक्रिया फेसबुकवरून दिली नाही. याउलट त्याने या दोन्ही देशांनी एकमेकांविरूद्ध सामने खेळले पाहिजेत व त्यासाठी दोन्ही देशांच्या बोर्डनी एकत्र येऊन क्रिकेटच्या सामन्यांबाबत सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे, असा प्रेमाचा संदेश रशिद लतिफने दिला आहे.

Embeded Object

अंतिम सामन्यानंतर सेहवाग-लतिफ यांचा वाद आणखीन चिघळेल अशी चिन्ह होती. कारण सामन्यापूर्वी अतिशय खालच्या थराला जाऊन लतिफने सेहवागला उत्तर दिले होते. पण कालच्या लतिफच्या प्रतिक्रियेनंतर खरोखरच या खेळाच्या माध्यमातून का होईना हे दोन देश एकत्र येतील का, अशी आशा निर्माण झाली आहे. लतिफने सुरूवातीला पाकिस्तान संघाचा कप्तान असणार्‍या सरफराजचे व संपूर्ण टिमचे कौतुक केले व त्यानंतर तो मुख्य मुद्द्याकडे वळाला. तो म्हणाला, “क्रिकेटला आर्थिक सबलता प्राप्त करून देण्यात भारत व पाकिस्तान या दोन संघाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी पुढील काळात एकत्र येऊन आणखी सामने खेळले पाहिजेत जेणेकरून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील तसेच त्यातून आर्थिक सुधारणा होण्यासही मदत होईल. कोण बाप, कोण मुलगा या सगळ्या वादांपासून आता आपण दूर होऊयात आणि चार प्रेमाच्या गोष्टी करून पुढील काळात आपले संबंध सुधारूयात. शेवटी हा खेळ आहे, जो चांगला खेळणार तो जिंकणारच.

Embeded Object

विरेंद्र सेहवागने देखील हा वाद कुठेही अधिक न खेचता पाकिस्तानच्या विजयानंतर एकदम ‘सॉफ्ट’ प्रतिक्रिया ट्विटरवरून पोस्ट केलीये. त्यामध्ये तो म्हणतोय, “विजेत्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे अभिनंदन. तुम्ही उत्तम खेळ केलात व विजयास पात्र असल्याचे दाखवून दिले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डसाठी देखील हा विजय मोलाचा ठरणार आहे.’’

Congratulations Pakistan on a really comprehensive victory today. Well played, deserved winners and a great result for Pakistan cricket.

Embeded Object

भारत-पाकिस्तान म्हटलं की वाद होतातच, पण अशातच क्रिकेटच्या रूपाने या दोन देशातील संबंध सुधारण्याची चिन्ह दिसत असतील तर त्याबाबत दोन्ही देशांच्या बाजूने सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. कदाचित ‘देर आए, दुरूस्त आए...’ अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते.