अनुष्काने केलाय शाहरूखबरोबर ‘इंडेम्निटी बाँड’
 महा त भा  19-Jun-2017


इम्तियाज अली एखादा चित्रपट काढतो म्हणजे त्यात काहीतरी वेगळेपणा हा असणारच. त्याचा नव्याने येऊ पाहात असलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगत आहे. अशातच आज शाहरूख खानने या चित्रपटाचा दुसरा मिनी ट्रेलर ट्विटरवर पोस्ट केलाय. या व्हिडिओमधून असं दिसतय की, अनुष्का शर्मा म्हणजेच सेजलने शाहरूख खान अर्थात हॅरी बरोबर ‘इंडेम्निटी बाँड’ केला आहे.

Embeded Object

आता हा इंडेम्निटी बाँड नेमका काय आहे ते लक्षात येत नाही, एवढ मात्र नक्की कळतयं की हा बाँड सेजल आणि हॅरीच्या शारीरिक संबंधांबाबत केला गेलेला असतो. सेजलच्या संवादफेक कौशल्यावरून ती एक गुज्जू मुलीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक गमतीशीर गोष्टी पुुढील काळात आपल्याला पाहयला मिळतील तसेच हा चित्रपट देखील एका वेगळ्या प्रकारचे मनोरंजन आपल्या समोर सादर करेल असचं वाटतं. येत्या 4 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.