चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत विरुद्ध पाक : विजय कुणाचा ?
 महा त भा  18-Jun-2017भारतात क्रिकेट म्हणजे खेळ नसून ती एक परंपरा झालीये. त्यातून भारत आणि पाकिस्तान सामना असला तर विचारायलाच नको. संपूर्ण देशासाठी तो देशभक्तीचा एक मोठा सोहळा असतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे.

ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडण्याची शक्यता :

भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीजे जेतेपत दोनदा पटकावले आहे. २००२ मध्ये भारत आणि श्रीलंका यांना संयुक्तरित्या हे पद मिळाले होते. ऑस्ट्रेलियाने देखील हे जेतेपद २००६ आणि २००९ मध्ये म्हणजेच दोनदा पटकावले आहे. यावर्षी भारत जिंकल्यास भारत ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडण्यास समर्थ ठरेल. तसेच भारत तीसऱ्यांदा हे जेतेपद पटकावण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरेल. 

 

 

Embeded Object

 

भारतानं बांग्लादेशवर तर पाकिस्ताननं इंग्लंडवर मात करत अंतिम सामना गाठला आहे. या आधीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता, त्यामुळे आज देखील भारतच जिंकणार असा विश्वास भारतीयांच्या मनात असून प्रेक्षकही सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. यासाठी दोन्ही देशांनी भरपूर तयारी केली आहे.

Embeded Object

 

दरम्यान भारत आणि पाकिस्तान जिंकण्यासाठी मैदानात उतरतील, भारतीय संघातील सर्व खेळाडू एकजूट होऊन आपला सर्वोत्तम खेळ करतील अशी गाव्ही कर्णधार विराट कोहली याने दिली. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.