भारत-पाकिस्तान सामन्याला शाहरूख खानची हजेरी
 महा त भा  18-Jun-2017

 

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खान याने आपल्या व्यस्त दिनचर्येमधून काही वेळ काढत आपले देशप्रेम सिद्ध करत ‘भारत-पाकिस्तान’ सामन्याला हजेरी लावली आहे. शाहरूखने ‘इंडिया’ नाव असलेले टी-शर्ट या सामन्यासाठी घातले आहे. त्यासोबत त्याचा आगामी येणारा चित्रपट ’जब हैरी मेट सेजल’च्या  प्रमोशनलाही त्यांने या सामन्यादरम्यान प्रोत्साहन दिले आहे.

 Embeded Object

शाहरूखने आपल्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानचा सामना हा कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा असल्याने हा सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सोबतच किंग खान देखील या खेळाचा मनसोक्त आनंद घेतांना आपल्याला दिसत आहे.

 

आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यामुळे भारतीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोणता संघ विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची रंगत चांगलीच वाढली आहे. पाकिस्तानने भारतापुढे ३३९ चे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे भारत आता हे लक्ष भेदू शकते काय याकडे भारतीयांच्या नजरा राहणार आहेत.