प्रधानमंत्री सुरक्षा आणि जीवनज्योती विमा योजनेचे यश
 महा त भा  17-Jun-2017३२ खातेदार ग्राहकांच्या परिवाराला ६४ लाखांचा लाभ

उत्तर महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि सामाजिक बांधिलकी, राष्ट्रधर्म विचाराने कार्यरत शेड्यूल्ड बँक जळगाव जनता सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ३२ खातेदार ग्राहकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदार परिवाराला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना यांचा एकूण ६४ लाख रु.विमा रक्कमेचा लाभ मिळवून देत मोठा दिलासा दिला आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे २०१७ अखेर या दोन्ही विमा योजनेत २५ हजार ९९६ बँक खातेदारांनी नूतनीकरण केले आहे.

६५ वर्ष केवळ बाता


देशातील कष्टकरी, असंघटीत, अशिक्षित, उपेक्षित, अशिक्षित समाजघटक परिवारात विमा संरक्षणाचा अभाव असल्याने दुर्दैवाने अशा कुटुंबातील कमवत्या, कर्त्याचा अकाली, अपघाती वा नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास मोठी बिकट स्थिती ओढवत असते. हे भीषण वास्तव लक्षात घेऊन देशातील डाव्या, उजव्या सार्‍याच कामगार संघटनांनी प्रत्येकाला विमा संरक्षण असावे, अशी मागणी चालवली होती. पण २० कलमी कार्यक्रम, समाजवाद व कल्याणकारी राज्याच्या बाता मारणार्‍या कॉंग्रेस राजवटीने कधीच असे संरक्षण गोरगरीब परिवाराला मिळवून दिले नव्हते.

नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी


मात्र २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या अत्यंत साधारण परिवारातील नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने या योजना आणल्या. कर्त्या, कमवत्याचा अंत ओढवल्यावर परिवाराची दैना होऊ नये, त्यांची उपासमार टळावी या उदात्त, मानवी भावनेने त्यांनी गतवर्षीच अंमलात आणलेल्या या योजना आहेत.


संजीवनी ठरणार्‍या योजना


बिहार, उत्तर प्रदेशासह देशात बहुसंख्य जातीजमातील घरातल्याच्या मृत्यूनंतर परंपरेने विधी व उत्तरकार्य करण्यासाठी व्याजाने पैसा उभारणे, त्यासाठी घरदार विकणे, भूमीहिन होणे... हे वास्तव आहे. ते रोखण्यासाठी या विमा योजना जालीम उपाय ठरत आहेत.
नव्याने जीवन सुरु करणे, रोजगाराभिमुख व्यवसाय करणे, मुलाबाळांचे शिक्षण, लग्नादी जबाबदार्‍या पार पाडण्यासाठीही या योजना संजीवनी ठरत आहेत. बँकेच्या कार्यक्षेत्रात, प्रामुख्याने खान्देशात मे २०१७ या महिन्यात या दोन्ही विमा योजनेत २५ हजार ९९६ बँक खातेदारांनी नूतनीकरण केले आहे. त्यात ३३० रुपये हप्ता अदाकर्ते ७ हजार ९९२ आणि १२ रुपये हप्ताअदाकर्ते १८ हजार ००४ ही बाब या विमा योजनांची उपयुक्तताच अधोरेखित करते. रितसर दस्तावेजांची पूर्तता करुन कोणतीही व्यक्ती बँकेची ग्राहक होऊन विमा रक्कम भरुन विमा संरक्षण मिळवू शकते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना


ठळक बाबी- वयोमर्यादा १८ ते ७० वर्ष १८ ते ५० वर्ष

विमा रक्कम रु.२ लाख

फायदे-विमा कालावधीत अपघाती मृत्यू झाल्यास

रु.२०००००/-व अपंगत्वानुसार रु.१०००००/- ते रु.२०००००/-

विमा कालावधीत मृत्यू झाल्यास रु.२०००००/-

दोघांचा विमा कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे पयर्र्ंत

प्रिमीअम- रु.१२ आणि ३३० रु. प्रती व्यक्ती व वर्ष. विमा संरक्षण समाप्ती-खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास,नियमानुसार कमाल वयोमर्यादा

गाठल्यासकिंवा खाते बंद झाल्यास.

प्रिमीअम पेमेंट- नूतनीकरण दरवर्षी मे महिन्यात

लाभार्थी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

वार्षिक एकरकमी हप्ता रु.३३० ,

एकूण पॉलिसी - ८ हजार ५१६

एकूण मृत्यू दावे - २१

वारस व्यक्ती/ कुटुंबियांना अदा विमा रक्कम - ४२ लाख रु.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

वार्षिक एक रकमी हप्ता रु.१२

एकूण पॉलिसी - १८३३०

एकूण मृत्यू दावे - १०

वारस व्यक्ती/ कुटुंबियांना अदा विमा रक्कम - २० लाख रु.

(बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सभासदांचा काढलेला विमा - ५३९१)