‘कपिल शर्मा शो’ स्टार चंदन प्रभाकरचे निरागस शब्द
 महा त भा  17-Jun-2017

 

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेला विनोदी कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो'मधील नोकराची भूमिका करणाऱ्या चंदन प्रभाकरने आपल्या छोट्या मुलीचे फोटो व्टिटरवर शेअर आहेत. ‘देवाने दिलेली ही भेट माझ्या जीवनात खूप महत्वाची आहे’ असे म्हणत त्याने त्याचा आणि त्याच्या मुलीचा फोटो चाहत्यांपर्यंत पोहोचविला आहे.

 Embeded Object

आपल्या डोळ्यात देखील पाणी येईल असे निरागस शब्द चंदनने आपल्या मुलीसाठी लिहिले आहेत. चंदन प्रभाकर याची पत्नी नंदिनी हिने 31 मार्च रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर चंदनने एकदा त्याच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर त्याने आता दुसऱ्यांदा त्याच्या ‘परी’चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

चंदनच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असून चंदन आणि त्यांची पत्नी या मुलीच्या येण्याने खूप आनंदात आहेत. कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये ते नोकराची आणि चहा विकणाऱ्या माणसाची भूमिका करतात आपल्याला दिसतात. हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.