“आपा याद रह गया ना, नाम याद रखनें की जरूरत नहीं’’श्रद्धाचा Haseena Parkar Teaser मधून जबरदस्त लूक...
 महा त भा  16-Jun-2017


आजपर्यंत श्रद्धा कपूरने नेहमीच प्रेयसीच्या भूमिकेतील व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘आशिकी-2’ या तिच्या पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेवून ठेवले होते. पण त्यानंतर तिला पुन्हा त्या पातळीचे यश अजून संपादन करत आलेलं नाही. म्हणूनच ऑगस्ट महिन्यात येणार्‍या ‘हसिना पारकर’ या तिच्या नव्या चित्रपटाकडून तिच्या चाहत्यांना अपेक्षा आहेत. “आपा याद रह गया ना, नाम याद रखनें की जरूरत नहीं’ असं वेगळ्याच तोर्‍यात म्हणत श्रद्धाचा जबरदस्त गँगस्टर लूक आज टिझरमधून आपल्या समोर आला आहे. ‘आपा’ याचा अर्थ मोठी बहिण असा होतो.

Embeded Object

दाऊद इब्राहिम या मोस्ट वाँटेड कुख्यात गुंडाच्या आयुष्यावर आजपर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले पण यावेळी प्रथमच त्याची बहीण हसिना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात हसिनाची भूमिका श्रद्धा साकारणार असून दाऊदच्या भूमिकेत तिचा खर्‍या आयुष्यातील तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर बघितल्यावर हसिना पारकरच नेमकं आयुष्य कसं असेल, याची उत्सुका ताणली जाते हे मात्र नक्की.


अपूर्व लाखियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अपूर्वने याअगोदर ‘शुट आऊट अ‍ॅट लोखंडवाला’, ‘दस कहाँनिया’, ‘मिशन इस्तंबूल’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हसिंना पारकर हा चित्रपट 18 ऑगस्ट 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.