इसिसचा सुरक्षा प्रमुख सुलेमान अल शौनकचा रशियन आर्मीकडून खात्मा
 महा त भा  16-Jun-2017

 

आज रशियाच्या संरक्षण विभागाने जाहिर केलेल्या माहितीनुसार रशियन आर्मीने सीरियामध्ये केलेल्या लष्करी कारवाईत इसिसचा सुरक्षा प्रमुख सुलेमान अल शौनक मारला गेला आहे. याच बरोबर या हल्ल्याच्या वेळी इसिसचा म्होरक्या इब्राहिम अबु बक्र अल-बघदादी हा सुद्धा या  याठिकाणी उपस्थित होता, असा संशय रशियाच्या संरक्षण विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. परंतु अद्याप या विषयी कसलीही ठोस माहिती मिळालेली नाही.

 

Embeded Object

मे २०१७ मध्ये रशियन आर्मीच्या सीरियन अरब गणराज्यातील विभागाला दहशतवादी गट इसिसच्या नेत्यांच्या बैठकीची माहिती मिळाली होती. ही बैठक रक्का या सीरियाच्या दक्षिण भागात असलेल्या शहरात होणार होती.

या माहितीनुसार स्थानिक रशियन जनावांच्या तुकडीला २८ मे रोजी खात्री मिळाल्यावर तातडीने २९ मे रोजी नाविक दलाच्या साहाय्याने रशियाने या चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांमधील अमीर रक्का अबू अल-हज अल-मिसरी, अमीर इब्राहिम अन-नाईफ अल-हज यांना रक्का शहरात ठार करण्यात आले. या दहशतवाद्यांसोबत इसिसचा संरक्षण विभागाच्या प्रमुख सुलेमान अल शौनकचा रशियन आर्मीकडून खात्मा करण्यात आला.