चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकचा इंग्लंडवर दणदणीत विजय
 महा त भा  15-Jun-2017पाकिस्तान अंतिम फेरीत दाखल


पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर आठ गडी राखून विजय मिळवला आहे. लंडनमधील कार्डिफ मैदानावर झालेल्या या सामन्यातील विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला असून गुणतालिकेत ४ गुण मिळवत आयसीसी ग्रुप बीच्या दुसऱ्या स्थानावर आला आहे.


या सामन्याचा खेळ सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडची सलामीची जोडी मैदानावर जम बसवोल असे वाटत असतानाच ए हॉल्स याला अवघ्या १३ धावांवर बाद करण्यात आले. त्यानंतर बेअरेस्टो ४३, जो रूट ४६, ईऑन मॉर्गन ३३, बटलर ४, एम अली ११, ए राशीद ७, बेन स्टोक्स ३४, प्लुंकेट ९ आणि एम वूड ला अवघ्या ३ धावांवर बाद करण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. ४९ षटकात इंग्लंडचा संघ केवळ २११ धावा करू शकला. त्यामुळे विजयासाठी पाकसमोर २१२ धावांचे आव्हान होते. पाकने हे आव्हान ८ गडी राखत जिंकले आहे.

Embeded Object


पाकच्या एफ झामन याला ५७ तर अजहर असी याला ७६ धावांवर बाद करण्यात आले. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागिदारी रचत पाकिस्तानच्या विजयासाठी मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानकडून हसन अलीने तीन, जुनैद खान आणि रूमान रईस यांनी प्रत्येकी दोन तर शादाब खान याने एक गडी बाद केला. पाकच्या बाबर आढम ३८ आणि मोहम्मद हाफिजजन ३१ धावांची नाबाद केळी केली. पाकच्या या सामन्यात इंग्लंडपेक्षा पाकिस्तानचेच पारडे अधिक जड होते. पाकने इंग्लंडला मैदानावर स्थिरावण्याची संधीच दिली नाही. परिणामी, २ बाद २१५ धावा करून अंतिम सामन्यात दाखल झाला आहे.

Embeded Object

अंतिम फेरीत पाकचा सामना कोणाबरोबर ?

पाक अंतिम फरीत दाखल झाला असून आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होत आहे, या दोन संघांपैकी आजच्या सामन्यात जो जिंकेल त्याला अंतिम सामन्यात पाकबरोबर दोन हात करावे लागणार आहेत. सद्यस्थितीत तरी भारत मजबूत स्थितीत दिसत असून उपांत्य फेरीतील सामन्यात भारत जिंकल्यास भारत-पाक अशी लढत दिसू शकेल.