निती आयोग घडवणार आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात बदल
 महा त भा  15-Jun-2017


 

सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी निती आयोगाने पाऊल आहे. “साथ” (सस्टेनेबल ॲक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग सुमन कॅपिटल) या कार्यक्रमाअंतर्गत, निती आयोग कार्य करणार आहे. तीन राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून निती आयोग बौध्दिक, तांत्रिक आणि इतर आवश्यक ते सहाय्य देणार आहे. यासाठी एक स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिवेक देवरॉय, आयोगाचे सल्लागार अमिताभ कांत तसेच आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी या समितीमध्ये आहेत. निती आयोगाने तयार केलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना काय करावे लागणार आहे, याविषयी चर्चा करण्यात आली.

आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांची प्रारंभी निवड करण्यात आली आहे. तर शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्यासाठी मध्यप्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड आणि आंध्रप्रदेश राज्यांची प्रारंभी निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्षात जुलै २०१७ पासून यापैकी तीन-तीन राज्यांमध्ये निती आयोगाची परिवर्तन योजना लागू होईल, अशी अपेक्षा आहे.

Embeded Object

 Embeded Object

Embeded Object