वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) परिषदेची १८ जूनला बैठक
 महा त भा  15-Jun-2017


 

वस्तू आणि सेवा कर परिषदेची १७ वी बैठक केंद्रीय वित्त आणि संरक्षण व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. १८ जून २०१७ रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात होणार आहे. या एक दिवसीय बैठकीला वेगवेगळया राज्यांचे तसेच केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Embeded Object

Embeded Object

वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ११ जून रोजी झालेल्या १६ व्या बैठकीच्या वृत्ताला मान्यता देणे. त्याचबरोबर वस्तू आणि सेवा कर कायदे, नियमांच्‍या आराखडयांना मंजुरी देण्याची कामे या बैठकीत करण्यात करण्यात येणार आहे.

१ जुलै पासून लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कर विषयी विविध दरांची निश्चिती करण्यात आली आहे. ११ जूनच्या बैठकीत ६६ वस्तूंचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याआधी सोने, बिस्कीट, जीवनावश्यक वस्तूंचे दर निश्चित केले गेले होते.