भारतामधील डिजिटल परिवर्तन जाणून घेण्यामध्ये अनेक देशांना रस
 महा त भा  14-Jun-2017


 

“सबका साथ, सबका विकास” यासाठी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन या खात्याचे मंत्री मनोज सिन्हा यांनी “इन्फर्मेशन सोसायटी” च्या जागतिक शिखर परिषदेत जिनिव्हा येथे बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला सुनिश्चित दिशा मिळाली, असल्याचे सिन्हा यांनी यावेळी सांगितले.

“आधार” च्या मदतीने लाभाचे थेट हस्तांतरण, “भीम” ॲपद्वारे ई-पेमेंट, राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मोहीम, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स, ई-मंडई यासारख्या सुविधा भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्‍ध करुन देण्यात आल्या आहेत. यामुळे भारतात डिजिटल क्षेत्रात झालेले परिवर्तन जाणून घेण्याची उत्सुकता अनेक देशांना आहे.

जिनिव्हामध्ये १२ ते १६ जून दरम्यान या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली भारताचे उच्चस्तरीय मंडळ या परिषदेला उपस्थित राहिले आहे.

Embeded Object