लंडनमध्ये राहत्या इमारतीला भीषण आग
 महा त भा  14-Jun-2017


लंडनमधील लँचेस्टर येथील एका २४ मजली इमारतीला काल मध्यरात्री भीषण आग लागली आहे. संपूर्ण इमारत या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. दरम्यान इमारतीतून १०० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाच्या ४५ गाड्यासह २०० कर्मचारी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.


लंडन शहराच्या पश्चिमेला असलेल्या लँचेस्टर येथील 'ग्रीनफेल' या २४ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काल मध्यरात्री १ अचानकपणे आग लागली. थोड्याच वेळात या आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण इमारतच आपल्या कवेत घेतली. संपूर्ण इमारतीत पसरत चालेल्या या आगाचे भीषण रूप पाहून आसपासच्या नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.

Embeded Object


त्यानंतर अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तो पर्यंत आग खालच्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत पसरली होती. मोठ्या अग्निशमन दलातील जवान काही नागरिकांना देखील सुखरूप बाहेर काढले आहे. तर काही नागरिकांनी घरातील ब्लँकेट, चादर आपल्या भोवती गुंडाळून इमारतीतून आपली सुटका करून घेतली. यामध्ये काही नागरिकांना किरकोळ जखमा देखील झाल्या आहेत.

Embeded Object


संपूर्ण इमारतीला लागलेल्या या भीषण आगीमुळे धुराचा प्रचंड लोट आकाशात उडाला होता. धुरामुळे अग्निशमन दलातील जवानांना देखील मोठ्या प्रमाणत त्रास होत होता. आगीचे रौद्ररूप पाहून आसपासच्या नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पूर्ण इमारत जाळून खाक झाल्यामुळे ही इमारत कधीही कोसळू शकते, अशी माहिती अग्निशमन दलातील जवानांनी दिली. त्यामुळे आसपासच्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान आगीचे नेमके करण मात्र अद्याप समजू शकले नाही.