मोदी सरकारचे कृषी धोरण योग्य दिशेने - एम. एस.स्वामिनाथन
 महा त भा  14-Jun-2017


 

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आखलेले धोरण म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले स्वामिनाथन आयोगाचे निर्माते एम एस स्वामिनाथन यांनी स्वत: मोदी सरकारच्या कृषी विषयक धोरणांचे कौतुक केले असून, ते योग्य दिशेने जात असल्याचे प्रशस्तीपत्रच दिले आहे.

Embeded Object

Embeded Object

स्वामिनाथन यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने कृषी विषयक धोरणं चांगल्या प्रकारे राबविली आहेत. मृदा गुणवत्ता कार्ड, बियाणे यांविषयी केंद्र सरकारने घेतलेला पुढाकार चांगला आहे. त्याच बरोबर प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची देखील प्रशंसा त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने आयोगातील बऱ्याच तरतुदी राबविल्या असून इतर अनेक तरतुदींसाठी सकारात्मक आहे.

देशातील ५०% ग्रामीण महिला कृषी उद्योगासाठी पूरक कामगिरी करत असतात, त्यामुळे ग्रामीण महिलांसाठी कृषी आधारित कौशल्य विकासाच्या योजना केंद्र सरकारने राबविणे कृषी क्षेत्रासाठी फायद्याचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. नारेगा सारख्या प्रकल्पांतर्गत कृषी उद्योजक घडविण्याच्या सरकाच्या पुढाकाराला देखील त्यांनी वाखाणले आहे.

गेल्या काही वर्षांत झालेल्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. तरी देखील या वर्षी कृषी क्षेत्रात बम्पर उत्पादन झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ झाला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अल्पभूधारकांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर, तसेच मध्यप्रदेश, राजस्थान येथे कर्जमाफीची होत असलेली मागणी या वातावरणात स्वामिनाथन यांचे हे भाष्य अतिशय महत्वपूर्ण ठरते.

काय आहे स्वामिनाथन आयोग?

 

Embeded Object