भारतात येणार पहिला नोकिया 'एऩ्ड्रॉइड ' स्मार्ट फोन
 महा त भा  13-Jun-2017भारतात अनेकांची आवडती असलेली नोकिया कंपनी आता भारतात पहिल्यांदाच एऩ्ड्रॉइड स्मार्ट फोन घेवून येत आहे. फिनलँडची कंपनी एचएमडी ग्लोबल आज भारतात हे स्मार्ट फोन लॉन्च करेल. नोकियाने, अत्यंत प्रसिद्ध झालेला नोकिया ३३१० भारतात या आधीच आणला होता. या आधी भारतात नोकियाचे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन वापरात होते, मात्र आता नोकियाचे एऩ्ड्रॉइड फोन आल्याने वापरकर्त्यांना आनंद झालेला आहे.

हे तीनही स्मार्टफोन्स नोकिया ३, नोकिया ५ आणि नोकिया ६ आहेत. तसेच यांच्या किंमती अनुक्रमे ९ हजार, ११ हजार आणि १५ हजार रुपये असणार आहेत. सामान्य माणसाला परवडण्यासारखा आणि विश्वसनीय असलेला हा मोबाइल आता भारतात आल्याने वापरकर्त्यांना सोयीचे झाले आहे.
नोकिया ३ मधील महत्वाचे फीचर्स :

यामध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यामध्ये MTK क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच मध्यम कींमतीतला असल्याने हा परवडण्यासारखा देखील आहे. या फोनचा मागचा भाग एल्यूमिनियम आणि पॉलिकार्बोनेटने बनलेला आहे.

नोकिया ५ मधील महत्वाचे फीचर्स :

यामध्ये ५.२ इंचाची HD स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच यामध्ये अत्यंत दणकट असलेला गोरिल्ला ग्लास वापरण्यात आला आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि एऩ्ड्रॉइड ७.१.१ नूगट ऑपरेटिंग सिस्टम आणि क्वॉलकॉम स्नैपड्रैगन प्रोसेसर देण्यात आला आहे.. तेसच 16GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे, ज्याला कार्डच्या माध्यमातून 128GB पर्यंत वाढवता येवू शकतं.

नोकिया ६ मधील महत्वाचे फीचर्स :
यामध्ये देखील गोरिल्ला ग्लास सह ५.५ इंचाची HD स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये स्नैपड्रैगन 430 Soc प्रोसेसर आणि 4GB रॅम सह 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे हा फोन डुअल सिम असणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दोन सिमकार्डचा वापर करता येवू शकेल. यामध्ये त्वतिरत चार्जिंग सुवेधेसाठी 3000mAh ची न काढता येण्यासारखी बॅटरी देण्यात आली आहे.