अवघ्या १२ दिवसांत केले ब्रिटीशकालीन बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन
 महा त भा  12-Jun-2017


 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील, तीळगंगा नदीवर असणाऱ्या, १९४१ सालच्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्यातील ४८ हजार घनमीटर गाळ अवघ्या १२ दिवसात काढून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

४०० मीटर लांबी, ८० मीटर रूंदी आणि ३ मीटर ऊंची असणाऱ्या या बंधाऱ्याचा उपयोग कोरेगाव, आसरे, कुमठे ग्रामस्थांनी होणार असून, आसपासच्या क्षेत्रातील भूगर्भ पातळी वाढण्यात मोठ्याप्रमाणात मदत होईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने विजयराव पंडित, शरयू फौंडेशन तसेच कोरेगाव नगरपंचायत, आसरे, कुमठे येथील ग्रामस्थांच्या सहभागातून हे काम झाले आहे. गेली २ वर्षे हे काम होण्यासाठी नागरिकांच्या हालचाली सुरु होत्या. यावर्षी रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या पुढाकाराने १०० जणांची बैठक संपन्न होऊन यात ३० जणांची 'कोरेगाव जलयुक्त शिवार समिती' तयार झाली आणि काम सुरु झाले.

यात समितीच्या कार्यकर्त्यांबरोबरच आसपासच्या गावांतील नागरिकांनी देखील आर्थिक सहभाग नोंदविला आहे. लोक सहभागातून उभे राहिलेल्या या कामाला शासनाने देखील पैश्यांची मदत केली असून, अशा आणखी दोन बंधारे, व तिळगंगा नदीच्या स्वच्छतेचा प्रकल्प हाती घेऊन कोरेगाव वासियांसाठी पुढच्या २५ वर्षांसाठीचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटविण्यासाठी तयारी समितीच्या कार्यकर्त्यांची आहे.