जीएसटी बैठकीत ६६ वस्तूंच्या करांचे दर ठरले - अरूण जेटली
 महा त भा  11-Jun-2017अर्थमंत्रालयाला एकूण १३३ वस्तूंच्या किमतीत बदल करण्याचा प्रस्ताव मिळाला होता, त्याचा विचार करूनच ६६ वस्तूंच्या करांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले. नवी दिल्ली विज्ञान भवन येथे वस्तू आणि सेवा कर विधेयकाची आज १७ वी बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Embeded Object

चित्रपटांवरील जीएसटी दरांच्या दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. १०० रूपयांपेक्षा वरील तिकीटावर २८ टक्के तर १०० पेक्षा कमी दर असणाऱ्या तिकीटांवर १८ टक्के दर आकारले जाणार आहेत. कॉम्पोझिशन योजनेअंतर्गत मर्यादा ७५ लाखांनी वाढवण्यात आली आहे. आजच्या बैठकीत ठरवण्यात आलेल्या दरांमुळे सामान्य माणसासाठी वस्तू स्वस्त होणार असून सरकारच्या महसूलावर मात्र परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जीएसटी परिषदेची १८ वी बैठक पुढील आठवड्यात होणार असल्याचे जेटली यांनी सांगितले आहे.

Embeded Object

तसेच इन्सुलिनवरील जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला असून स्कूल बॅगवरील दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जेटली यांना सॅनिटरी नॅपकिन्सच्या दरांविषयी विचारणा केली असता या बदलांशिवाय अन्य वस्तूंवरील प्रस्तावित करात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Embeded Object

 

दर बदललेल्या वस्तू 

काजू, पॅकेज फूड, प्लॅस्टिक मोती, मनोरंजन कर, उदबत्ती, स्कूल बॅग, ट्रॅक्टर आणि कॉम्प्यूटर प्रिन्टर्स