बाहुबलीची हजार कोटींची 'विक्रमीझेप'
 महा त भा  07-May-2017


भारतीय चित्रपटाला एका नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या एस.एस.राजमौली दिग्दर्शित बाहुबली-२ चित्रपटाने आज एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली-द कन्क्लूजन' या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत, १ हजार कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. १ हजार कोटींच्या घरात गेलेला 'बाहुबली-२' हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.


प्रसिद्ध निर्माता करण जोहर याने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. भारतीय सिनेसृष्टीत बाहुबली-२ ने यशाचे सर्वोत्तम शिखर गाठले आहे अशा शब्दात करणने आपला आनंद व्यक्त केला आहे. अवघ्या १० दिवसांमध्ये बाहुबलीने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. बाहुबलीच्या या विक्रमाने चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

Embeded Object


गेल्या आठवड्यात २८ तारखेला जगभरातील ९ हजार स्क्रीनवर बाहुबली- २ प्रदर्शित झाला होता. बाहुबलीच्या चाहत्यांनी देखील मोठ्या उत्साहाने या चित्रपटाचे स्वागत केले होते. पहिल्याच दिवशी बाहुबली-२ चे जवळजवळ ९० टक्के शो हाउसफुल झाले होते. यामुळे हा चित्रपट नवीन विक्रमांना गवसणी घालणार हे सिद्ध झाले होते.