सलमान खानचा चित्रपट ट्युबलाईटचा टीझर प्रदर्शित
 महा त भा  05-May-2017दबंग स्टार सलमान खान आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी नेहमीच चर्चित राहणारा अभिनेता आहे. आता ट्युबलाईट या त्याच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर सलमानने स्वत: आपल्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला आहे. या टीझरमधून सलमान खानची भूमिका दमदार असल्याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. या चित्रपटात सलमान खान आणि सोहेल खान या दोघी भावांची जोडी दाखवण्यात आली आहे.

बऱ्याच दिवसांपासून सलमानच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बऱ्याच चर्चा होत्या शेवटी आता हा टीझर प्रदर्शित करण्यात आला असल्याने सोशल मीडियावर या टीझरची क्रेझ पाहायला मिळत आहे. टीझर प्रदर्शित होऊन फक्त अठरा तास झाले असले तरी देखील आतापर्यंत ५,४०९,७४० प्रेक्षकांनी हा टीझर पहिला आहे. या चित्रपटात सैनिकांचे जीवन आणि युद्ध दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असे टीझर मधून लक्षात येते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान असून सलमान सोबतचा हा त्यांचा तिसरा चित्रपट असणार आहे. याआधी त्यांनी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट एकत्र केले होते. त्यामुळे ट्युबलाईट हा या सिरीजमधील तिसरा चित्रपट असणार आहे. या आधीच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आता ट्युबलाईट हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Embeded Object