दारणाच्या बिगरसिंचन आरक्षित पाण्याचे समान वाटप
 महा त भा  03-May-2017


दारणा धरणातील बिगरसिंचन आरक्षित पाण्याचे समान प्रमाणात वाटप केले जावे असे आदेश जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

दारणा धरणातील बिगरसिंचन आरक्षित पाण्याच्या वाटपासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कोपरगावच्या आमदार श्रीमती स्नेहलताई कोल्हे आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम, २००५ या कायद्यानुसार सिंचनाचे जसे समन्यायी प्रमाणात वाटप केले जाते त्याच पध्दतीने बिगर सिंचन पाण्याचेही वाटप केले जाणार आहे. या भागातील २५ टक्के धरणाच्या पाण्यापैकी १५ टक्के पिण्यासाठी आणि १० टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणून या धरणातील बिगरसिंचनातील पाण्याचे वाटप समन्यायी पध्दतीने करुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यमंत्री शिवतारे यांनी दिले.